कुंभी कारखाना निवडणुकीसाठी , २२ अर्ज अवैध तर ३७४ अर्ज वैध
कोल्हापूर :
कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याच्या २३ संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी एकूण ४८६ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते, छाननी झाली यामध्ये
२२ अर्ज अवैध झाले तर
३७४ अर्ज वैध ठरले आहेत.

कुंभी कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी दि.६ रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. एकूण ४८६ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.
गट व अवैध अर्ज असे….
उत्पादक गट क्रमांक एक मध्ये कुडित्रे परिसर २, क्रमांक दोन सांगरुळ परिसर २, क्रमांक तीन २, क्रमांक चार ६, क्रमांक पाच २, अनुसूचित जाती जमाती १,महिला २, इतर मागास ५ ,भटक्या जाती शून्य.
सोमवार दि. १६ ते सोमवार दि. ३० जानेवारीअखेर उमेदवारी अर्ज माघारीची मुदत आहे. चिन्ह वाटप मंगळवार दि.३१ जानेवारी रोजी करण्यात येणार आहे.त्यानंतर १ फेब्रुवारी पासून प्रचाराची रणधुमाळी सुरु होणार आहे.
रविवार दि.१२ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे, तर मंगळवार दि.१४ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे.