गोकुळ : कडून म्हैस दुध खरेदी दरात १ रुपये ५० पैसे वाढ ; गाय दूध खरेदी दरात २ रूपये कपात :चेअरमन अरुण डोंगळे

कोल्हापूर (ता ३०):
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पाेदक संघ (गोकुळ) संघाशी सलग्न म्हैस दूध उत्पादकांना दूध वाढविणेस प्रोत्साहन मिळावे म्हणून संघाने सध्याचे म्हैस दूध खरेदी दरामध्येे वाढ केलेली आहे. तरी दि.०१/१०/२०२३ इ.रोजी पासून म्हैस दूध ५.५ फॅट ते ६.४ फॅट व ९.० एस.एन.एफ प्रतिचे दुधास प्रतिलिटर रुपये १ ने दूध खरेदी दरात वाढ केली आहे. तसेच ६.५ फॅट व ९.० एस.एन.एफ प्रतिच्या पुढील दुधास प्रतिलिटर १ रुपये ५० पैसे दूध खरेदी दरामध्ये वाढ केली आहे. दि.३०/०९/२०२३ इ.रोजीच्याि संचालक मंडळाच्या मिटिंगमध्येध निर्णय घेण्या त आला आहे. अशी माहिती संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी दिली .
दिनांक ०१/१०/२०२३ इ.रोजी पासून दुध पुरवठा करणाऱ्या जिल्ह्या व जिल्ह्याबाहेरील दुध उत्पादकांच्या गाय दुध खरेदी दरामध्ये २ रुपये कपात करण्यात आलेले आहे. महाराष्ट्र मध्ये खाजगी व इतर दूध संघांचे गाय दुधाचे खरेदी दर कमी झाले आहेत. बाजारपेठेतील दुध पावडर, बटर, लोणी यांचे दर कमी झाले आहेत. या सर्व बाबींचा विचार करून गाय दूध खरेदी दर कमी करणेत येत आहे.
म्हैस दूध खरेदी दरामध्येा ६.० फॅट व ९.० एस.एन.एफ करीता प्रतिलिटर रुपये ४९.५० वरून रूपये ५०.५० करण्यात आला आहे. तसेच ६.५ फॅट व ९.० एस.एन.एफ करीता प्रतिलिटर रूपये ५१.३० वरून रूपये ५२.८० करण्यात आला आहे.
गाय दुधामध्ये० ३.५ फॅट व ८.५ एस.एन.एफ करीता प्रतिलिटर गाय दूध खरेदी दर ३५.०० रूपये वरून ३३.०० रूपये करण्यात आला आहे.तसेच दि.०१/१०/२०२३ इ.रोजी पासून सुधारित दरपत्रक लागू होईल. संघामार्फत प्राथमिक दूध संस्थाना सुधारित दरपत्रक पाठवणेत येणार आहेत.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!