रासायनिक खतांची दरवाढ : शेतकऱ्यांच्या अडचणीत भर

Tim Global :

रब्बी हंगामाच्या सुरवातीला पुन्हा एकदा रासायनिक खतांची दरवाढ झाली आहे.खत कंपन्यांनी १०:२६:२६ ,आणि पोटॅश खताचे दर वाढविले आहेत. यामुळे महापूर ,अतिवृष्टीने अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणी त भर पडणार आहे.
दर वाढल्यामुळे सुमारे कोटीचा फटका रब्बी हंगामात शेतकऱ्यांना बसणार आहे. खताची दरवाढ मागे घ्यावी अशी मागणी होत आहे.

जिल्ह्यात रब्बी हंगामाचे २२ हजार ८०० हेक्टर क्षेत्र आहे ,एक ऑक्टोबरपासून रब्बी हंगाम सुरू झाला आहे. या हंगामासाठी १ लाख ५४ हजार टन खताची मंजुरी मिळाली आहे. काही दर वाढलेले खत येण्यास सुरुवात झाली आहे.

यंदा पुराने नदीकाठची पिके गेली आहेत, त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत असताना पुन्हा खत दरवाढीची टांगती तलवार शेतकऱ्यांच्या वर आहे. खरीपात मोदी सरकारने खत दरवाढ झाल्यानंतर पुन्हा मागे घेतली होती. सध्या युरिया व डीएपी खताचे दर स्थिर आहे. मात्र डीएपी खताचा तुटवडा जाणवत असून, वेअरहाऊसमध्ये खत उपलब्ध नाही , आडसाली ऊस लागणीला खते टाकण्यात शेतकरी यांना अडचणी निर्माण झाल्या आहेत.

सध्या १०:२६:२६ खताचे दर जुने ११८५ रुपये होता, आता सतराशे रुपये झाला आहे, पोटॅश एक हजार रुपयेचा दर ,एक हजार चाळीस रुपये झाला आहे. चीन व तालिबान येथील युद्धामुळे कच्चे मटेरियल मिळत नाही यामुळे दर वाढले आहेत असे सूत्रांकडून सांगितले जाते.

जिल्ह्यात सुमारे वीस हजार हेक्टर आडसाली लागनी पूर्ण झाल्या आहेत, मात्र खताचे दर वाढल्यामुळे शेतकरी युरियाचा वापर मोठ्या प्रमाणात करत आहेत,यामुळे पिकांची वाढ पुरेशा प्रमाणात वाढलेली नाही.

एका खत विक्रेत्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आठ टन युरिया घेतला तर चार टन कॉम्प्लेक्स खते घ्यावे लागतात, तो माल विकायचं कुठे असा प्रश्न विक्रेते याच्यासमोर आहे, लिंकिंग होत असल्यामुळेही खत शॉर्ट झाले आहे असे चित्र आहे.

==================
ज्ञानेश्वर वाकुरे जिल्हा कृषी अधीक्षक,

खत लिंकिंग विरोधात मोहीम हाती घेणार आहे, लिंकिंग होत असेल ,तर आमच्याशी संपर्क साधावा,

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This will close in 0 seconds

विक्री - देणे घेणे, बाबत ..!

X
error: Content is protected !!