विश्वास पाटील (आबाजी ) अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त उद्या मंगळवारी मातृ – पितृ पाद्यपूजन कार्यक्रम : इंद्रजित देशमुख यांचे ‘ पूजनीय आई – बाबा ‘ या विषयावर व्याख्यान
कोल्हापूर :
गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष व विद्यमान ज्येष्ठ संचालक, रयत सेवा संघाचे मार्गदर्शक शिरोली दुमाला ( ता. करवीर) गावचे ज्येष्ठ नेते विश्वास नारायण पाटील (आबाजी ) यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवस कार्यक्रम अंतर्गत उद्या मंगळवार दि. ११ मार्च २०२५ रोजी मातृ – पितृ पाद्यपूजन कार्यक्रम आयोजित केला आहे. तसेच संत अभ्यासक मा. इंद्रजित देशमुख यांचे ‘ पूजनीय आई – बाबा ‘ या विषयावर व्याख्यान होणार आहे.
शिरोली दुमाला येथील एकनाथ विद्यालय व छत्रपती शिवाजीराजे रेसिडेन्सी शाळेच्या पटांगणावर सायंकाळी ठिक ५. ३० वाजता हा कार्यक्रम होत असून या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मा. श्री. विश्वास पाटील (आबाजी ) अमृतमहोत्सवी वाढदिवस गौरव समितीच्या वतीने करण्यात आले.